Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

महामंडळाची उद्दीष्टे

१. महाराष्ट्रात विदेशी / स्थानिक / संकरित शेळ्या मेंढयांची पैदास प्रक्षेत्रे स्थापणे व त्याचा विस्तार करणे.
२. शेळ्या मेंढयांच्या पैदाशीकरिता उपयुक्त ठिकाणी अशा केंद्राची वाढ करणे.
३. शेळ्यामेंढया आणि त्यापासून उत्पादित होणा-या वस्तूंची आयात-निर्यात करणे, शेळ्या - मेंढयांची पैदास करणे आणि विक्री करणे.
४. स्थानिक शेळ्या मेंढयांची अनुवंशीक सुधारणा करण्यासाठी संकरित पैदास कार्यक्रम हाती घेणे / अथवा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाला मदत करणे.
५. शेळ्या मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून पशुपालकांना प्रति शेळी-मेंढी मिळणा-या उत्पादनात वाढ ‍ होऊन शेळी-मेंढी पालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी शासनाच्या मदतीने / मदतीशिवाय विस्तार केंद्रे स्थापणे.
६. शेळी मेंढी पालनाला उत्तेजन देण्यासाठी सहकारी संस्था, व्यक्ति अथवा फर्म यांना वित्तीय पुरवठा करणेकरिता मदत करणे.