Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

स्थापना व उद्दीष्ट

history_icon

  1. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा १९५६ अन्वये नोंदणी क्र. २०५६०/सीटीए नुसार दि. ८ ऑगस्ट १९७८ रोजी करण्यात आली आहे.
  2. महामंडळाच्या स्थापनेनंतर पशुसंवर्धन खात्याच्या ताब्यातील ९ मेष पैदास प्रक्षेत्रे व १ लोकर उपयोगिता केंद्र दि. १/११/१९७९ पासून आणि १ शेळी पैदास प्रक्षेत्र दि. ७ ऑगस्ट १९८४ पासून महामंडळास हस्तांतरित करण्यात आली आहे.
  3. त्यांनतर आदिवासी गोवारी शहिद स्मृती शेळी व पशुपालन संस्था बोंद्री, जि.नागपूर ही संस्था दि. ६ जुलै २०१० पासून महामंडळास हस्तांतरित करण्यात आलेली आहे.

उद्दिष्टे

  1.  महाराष्ट्रात विदेशी/स्थानिक/संकरित मेंढयांची पैदास प्रक्षेत्रे स्थापणे, विस्तार करणे अथवा त्या पूर्नगठीत करणे.
  2.  मेंढयांच्या पैदाशीकरिता उपयुक्त ठिकाणी अशा केंद्राची वाढ करणे.
  3.  मेंढया आणि मेंढयांपासून उत्पादित होणा-या वस्तूंची आयात  निर्यात करणे,    मेंढयांची पैदास करणे आणि विक्री करणे.
  4.  स्थानिक मेंढयांची जात सुधारण्यासाठी संकरित पैदास कार्यक्रम हाती घेणे/ अथवा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाला मदत करणे.
  5.  मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून मेष पालकांना प्रतिमेंढी मिळणा-या उत्पादनांत वाढ ‍ होऊन मेषपालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी शासनाच्या मदतीने/मदतीशिवाय मेष विस्तार केंद्रे स्थापणे.
  6. मेषपालनाला उत्तेजन देण्यासाठी सहकारी संस्था, व्यक्ती अथवा फर्म यांना बँकेमार्फत कर्ज मिळविणेकरिता प्रकल्प अहवाल तयार करण्यास मदत करणे.